मुंबई : Inflation Update: Tomatoes are getting in petrol price, Vegetables are expensive :पावसाळ्याच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात टोमॅटो मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटोचे भाव किलोमागे 80 ते 100 रुपयांच्या घरात गेलेत. पेट्रोल डिझेलप्रमाणे टोमॅटोही महागला आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणातला टोमॅटो हद्दपार होण्याची भीती आहे. 


दुसरीकडे पालेभाज्याही कडाडल्या आहेत. बाजारात मेथी, कांदापात, पालक, शेपू, कोथिंबीर या भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.


मेथीची जुडी 40 रुपयांना मिळत आहे. तर कोथिंबीरची जुडी 50 ते 60 रुपयांना मिळत आहे. कांद्याचे दर मात्र घसरले आहेत. कांदा 15 ते 20 रूपये किलोने विकला जात आहे.