मुंबई : परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जमखींवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ ते ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील काही जखमींची नावे समोर आली आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे केईएम रूग्णालयात दाखल झाले आहेत. 



तर संतप्त नागरिकांनी पीयूष गोयल यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. राज्य सरकारकडून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जमखींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. 


मुंबईत सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे ही स्थिती उदभवली असल्याचं सांगण्यात येत आहे. पादचारी पुलावर गर्दीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, आणि पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे.