Injustice against Marathi: कल्याण, मुंब्रानंतर आता मरिन लाईनमध्ये मराठीची गळचेपी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठी पोर आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत. मराठी पोर आम्हाला कामाला नको, असे मरिन लाईन्स येथील राधेश्याम कंपनीकडून सांगत तरुणाला नोकरी नाकारण्यात आली. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि दोन दिवसात सोडून जातात म्हणून आम्हाला मराठी पोर कामाला नको असं कंपनीच्या मालकानं म्हंटलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी तरुणाला नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार मरिन लाईन्स येथे घडला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. मराठी पोरं आमच्यासाठी सुट होत नाहीत. असं देखील कंपनीतील कंपनीचा मालक तरुणाला बोलला असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.राधेशाम ब्रदर्स असे या कंपनीचे नाव असून मरिन लाईन्स येथे ही कंपनी आहे. 



येथे एक मराठी तरुण मुलाखतीसाठी गेला  होताय पण त्याला नोकरीवर घेण्यास राधेश्याम कंपनीच्या मालकाने नकार दिला.  मराठी पोरं नोकरीला येतात आणि दोन दिवसांत जातात ते आम्हाला सुट होत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं. त्यानंतर या तरुणाने हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाच्या निदर्शनास आणून दिला. पुढे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी अमराठी व्यापाऱ्याला जाब विचारला.