राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक... आज देशभरात नौदल दिन अभिमानाने साजरा होतोय. त्यानिमित्त आम्ही झी २४ तास तुम्हाला सैर घडवणार आहोत आयएनएस विक्रमादित्यची...


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय नौदलातली सध्याची एकमेव एअरक्राफ्ट कॅरियर. भारतीय नौदलाची बाहुबली...


४ डिसेंबर... संपूर्ण देश उत्साहात नौदल दिन साजरा करत आहे. १९७१च्या युद्धात याच दिवशी भारताने कराची बंदर भस्मसात करून टाकलं होतं. ऑपरेशन ट्रायडंट असं त्या गौरवशाली मिशनचं नाव. 


३ डिसेंबरच्या रात्री भारताच्या सहा नाविक तळावर पाकिस्तानी बॉम्बर्सनी हल्ला केला. त्यानंतर भारताच्या आयएनएस निर्घट, आयएनएस निपट आणि आयएनएस वीर या भारताच्या मिसाईल जहाजांनी कराचीवर हल्ला केला. त्यांच्यासोबत होते आयएनएस किल्तान आणि आयएनएस कॅटचल.


चार डिसेंबरला रात्रीच्या अंधारात भारताच्या या युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला आणि चार पाकिस्तानी जहाजं बुडवली. तसंच बंदरावरच्या इंधन डेपोलाही बेचिराख करत कराची बंदर भस्मसात केलं. त्या विजयाच्या आठवणींप्रित्यर्थ साजरा केला जातो नौदल दिन.


या विजयी आठवणींनंतर भारताची सध्याची बाहुबली अर्थात आयएनएस विक्रमादित्यविषयी जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे. भारताच्या ताफ्यात असलेली सध्याची एकमेव विमानवाहू युद्धनौका... मार्च महिन्यात सेवेतून निवृत्त झालेल्या आयएनएस विराटनंतर सर्व भार विक्रमादित्यच्या खांद्यावर आहे. रशियाकडून भारताने घेतलेली ही पूर्वाश्रमीची अॅडमिरल गॉर्शकॉव्ह...


हे जहाज म्हणजे अक्षरशः एक अभेद्य असा किल्लाच... या जहाजाच्या ५०० किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा माग इथे लागतो. मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम, मायक्रोवेव्ह लँडींग सिस्टीम असलेल्या या जहाजावर तब्बल १५०० नौसैनिक एकाच वेळी कार्यरत असतात. ११० ऑफिसर्स आणि १६०० खलाशी असा प्रचंड मोठा स्टाफ हे जहाज सांभाळतो.


केवळ संरक्षण नाही तर प्रसंगी मोठा हल्ला घडवून आणण्यासाठीही हे जहाज सज्ज आहे. विक्रमादित्यच्या ताफ्यात फ्रिगेट्स, मिसाईल बोट, पाणबुडी यांचाही समावेश आहे. 


आयएनएस विक्रमादित्यची वैशिष्ट्ये:


  • विक्रमादित्यचं वजन ४४,५७० टन


  • उंची ६० मीटर म्हणजेच २० मजली इमारतीएवढी


  • लांबी- २८५ मीटर, म्हणजे फुटबॉलची तीन मैदानं मावतील एवढी


  • वेग- २९ नॉट्स म्हणजे ५४ किमीप्रती तास


या भव्य जहाजावर २३ डेक आहेत. तब्बल ४५ दिवस खोल सागरात राहण्याची तिची क्षमता आहे. तब्बल २४ मिग २९ के ही लढाऊ विमानं आणि १० हेलिकॉप्टर तिच्या ताफ्यात आहेत. 


आयएनएस विक्रमादित्य हे एक समुद्रातलं शहरच आहे. नौसैनिकांसाठी इथे अद्ययावत मे़डीकल कॉम्प्लेक्स आहे. ३० बेड, २ ऑपरेशन थिएटर, १ आयसीयू, अत्याधुनिक डायग्नोस्टीव्ह सिस्टीम अशी सुविधा त्यात आहे. जहाजावर असलेल्या


अत्याधुनिक लॉंड्रीत रोज ३०० किलो कपडे धुतले आणि वाळवले जाऊ शकतात. ३ आलीशान किचन जहाजावर आहेत. जहाजाचं घोषवाक्यचं त्याची ख्याती सांगतं... 


स्ट्राईक फार, स्टाईक शुअर हे घोषवाक्य असलेली आयएनएस विक्रमादित्य ही शत्रूसाठी निश्चितच विनाशक आहे यात शंकाच नाही.



भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य