मुंबई : INS विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर नॉट रिचेबल असलेले भाजप (BJP) नते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) काल मुंबईत दाखल झाले. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्याने त्यांनी न्यायमुर्तींचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सागंण्यावरुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत सोमय्या यांनी लवकरच  महाविकास आघाडीतील डर्टी डझन नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. INS विक्रांतच्या पैशांचा अपहार शंभर टक्के झालेला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमीगत झाले होते. आरोपी फरार झाले होते. तुम्ही न्यायालयचा निकाल पाहाल, तर आरोपी निर्दोष नाहीत, आरोपींची कसून चौकशी व्हायला हवी, आरोपीला पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागणार आहे तेव्हा आरोपींनी उगाच वचवच करु नये असा इशारा दिला.


तात्पुरत्या जामीनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आपण आरोपी आहात हे विसरु नका.  तुमच्यावर आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केलेला आहे. टीव्हीसमोर येऊन बोलल्यामुळे तुमचा आरोप धुवून निघत नाही. याही पेक्षा भंयकर प्रकरण तुमची समोर येणार आहेत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 


जे शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचं पितळ आता उघडं पडलं आहे. तेव्हा कुणी काय बोलत असतील तर बोलू द्या, आरोपीच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


INS विक्रांतचा 58 कोटींचा घोटाळा झालेला आहे. पैसे गोळा करुन त्याचा अपहार झाला आहे. त्यांची अटक टाळण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना सुरक्षा आणि दिलासा द्यायचे प्रयत्न सुरु आहेत, हा एक गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. हे दिलासे महाविकास आघाडीच्या लोकांना का मिळत नाहीत. त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


आरोपीने कोणत्या प्रकारे हा जामीन मिळवलाय याबद्दल लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांची लोकं ज्या प्रकारे आहेत हे स्पष्ट दिसतंय, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.