मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ते २ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. ७ टक्क्यांवरून हे व्याजदर ६.९ टक्के करण्यात आलेत. या मुदतठेवींवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे. तर बचतखात्याच्या व्याजदरातही पावटक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता एसबीआयचे बचतखात्याचे व्याजदर ३.५० टक्क्यांवरून ३.२५ टक्क्यांवर आलेत. आता इतर बँकाही एसबीआयचे अनुकरण करण्याची शक्यता आहेत. त्यामुळे खातेधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर आजपासून लागू होणार आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्याच आठवड्यात रेपो दरात कपात केली.  त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे.