मुंबई : गुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही औरच असते. मुंबईकर थंडीचा आनंद तर घेतच आहेत. यातच आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. थंडी आणि चहा या दोन्हीचा दुग्धशर्करा योग आज आहे. मुंबईत अनेक प्रकारचे चहा मिळतात. मुंबईकर चहाचा पिण्याचा आनंद तसा रोज लूटत असतात. मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यलयं असल्याने येथे येणारा चाकरमानी टपरीवर चहा प्यायला येतोच. सोबत ऑफिसमधल्या आणि इतर गप्पा ही रंगतात. गप्पांसोबत चहाचा प्याला मुंबईकरांना मूड फ्रेश करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहा हा तसा भारतात अनेकांच्या आवडीचं पेय. पाण्यानंतर भारतात सर्वाधिक पिलं जाणारं हेच पेय असावं. जागतिक चहा दिन जरी आज असला तरी भारतात अनेक शहकांमध्ये चहा ही दिनचर्या झाली आहे. चहा हा आळस घालवून मूड फ्रेश करतो. त्यामुळे कंटाळा आला की, निघाले चहा प्यायला. कटिंग स्पेशल चहा मारता मारता अनेक चर्चा सुरु होतात.