मुंबई : मुंबईतली बाईक रायडर जागृती होगळेचा डहाणूमध्ये झालेल्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी पालघरजवळून बाईकवरुन जात असताना तिची बाईक खड्ड्यात अडकल्याने जागृती पडली. मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. 


पावसाळ्यात खड्ड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र असे जीव गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मपणे या साऱ्याकडे पाहत असते.