मुंबई : आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण धार्मिक बहुलता Against religious pluralism विरोधात हा राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर अब्दूल रहमान यांनी त्वरीत राजीनामा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएस अब्दुर रहमान यांनी झी न्यूजशी बातचित करताना सांगितलं की, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. पुढील रणनीती लवकरच ठरवली जाणार आहे. रहमान यांनी अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव करण्याचा देखील आरोप केला आहे.


मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे अब्दूर रहमान यांनी 3 महिन्याआधी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज देखील दिला होता. हा अर्ज मंजूर देखील झाला होता. पण लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हा अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव असल्याचं सांगत, अब्दूर रहमान यांनी त्वरीत आयपीएसचा राजीनामा दिला आहे.


नागरिकत्व सुधारणा विधेयक मंगळवारी लोकसभेत बहुमताने पारित झाले. त्यानंतर बुधवारी राज्यसभेत यावर चर्चा झाली आणि इथेही ते मंजूर करण्यात आले. 


११७ विरुद्ध ७२ अशा फरकाने विधेयक संमत झाले. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक देशात लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन लोकांना नागरिकत्व मिळू शकणार आहे.