लोकलची घरपोच पाससेवा सुविधा झाली बंद !
ऑनलाईन माध्यमातून मुंबई लोकलचे मासिक आणि त्रैमासिक पास काढण्याचा आणि तो अगदी घरपोच पोहचवण्याची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली होती.
मुंबई : ऑनलाईन माध्यमातून मुंबई लोकलचे मासिक आणि त्रैमासिक पास काढण्याचा आणि तो अगदी घरपोच पोहचवण्याची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली होती.
पण या सुविधेला मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे आता ही सुविधा रद्द करण्यात आली आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना लोकलचा पास घरपोच पोहचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळेस या सुविधेला प्रवाशांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. हा प्रतिसाद पाहून पास घरपोच सेवेचे शुल्कही रद्द करण्यात आले. पण कालांतराने प्रवाशांचा उत्साह कमी झाला आणि प्रतिसाद घटला. परिणामी आयआरसीटीसीने ही सेवा बंद केली आहे.
जून २०१७ मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लासच्या घरपोच सेवेतील पासची संख्या दोन हजारांपर्यंत घटली. रेल्वे मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या ७२ लाखांच्या आसपास असताना कुरिअरने घरपोच पास मिळण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने आयआरसीटीसीने ही सेवा बंद करणयचा निर्णय घेतला आहे.
घरपोच पास सेवा बंद झाल्याने आयआरसीटीसी च्या वेबसाईटवरील भार कमी झाला आहे. असेही सांगण्यात आले आहे.