मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा नुकताच पिरामल ग्रुपचे आनंद पिरामलशी साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबानी मैत्रीचे रुपांतर नात्यात केले. आनंदने इशाला महाबळेश्वर येथील मंदिरात प्रपोज केले होते. याच ठिकाणी इशाच्या सासरचा अलिशान बंगला आहे. इशाचे सासर मुंबईत असले तरी महाबळेश्वरमधील त्यांच्या या बंगल्याची चर्चा संपूर्ण जगभरात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हा बंगला आनंद पिरामलचे वडिल अजय पिरालम यांनी विकत घेतला होता. पिरामल एंटरप्रायजेसची वाईस चेअरपर्सन स्वाती पिरामल यांना गार्डनिंगची आवड आहे. त्यांनी या बंगल्याला विविध फुलांनी सजवलंय. ग्रीनवुड्स बंगल्यात ऑर्किड, लिली, आफ्रिकन डेजी, अल्केमिलिया, अॅस्टर, डॅफोडिल, क्विंस मांडेविला यासारख्या फुलांच्या जाती आहेत. 



अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वातीने २००६मध्ये हॉलिडे होम म्हणून महाबळेश्वरमधील ग्रीनवुड्स बंगला खरेदी केला होता. ग्रीनवुड्स बंगल्याला सांगलीचे महाराज विजय सिंह पटवर्धनच्या पूर्वजांनी १८६२मध्ये बनवला होता. पिरामल यांनी ही हेरिटेज बिल्डिंग खरेदी केल्यानंतर रिस्टोर केला. हा बंगला मराठा-विक्टोरियन स्टाईलमध्ये बनवण्यात आला होता.



बंगल्याचे मुख्य आकर्षक आहे दिवाणखाना. हा दिवाणखाना नृत्य आणि संगीत कार्यक्रमांसाठी वापरला जात असे. आता हा दिवाणखाना लिव्हिंग रुममध्ये रुपांतरित करण्यात आलाय. स्वाती पिरामल यांच्या मते त्यांचा मुलगा आनंद यालाही गार्डनिंगशी आवड आहे.



बंगल्याचा मुख्य भाग गेस्ट रुम्स आहे. याआधी या रुमचा वापर रॉयल कुटुंबांच्या घोड्यांना ठेवण्यासाठी होत असे. आता टेलिव्हिजन सेट, डायनिंग टेबल आणि वरच्या लेव्हलवर छोटी लायब्ररी बनवण्यात आलीये.



दरवर्षी येथे फ्लॉवर शो आयोजित करण्यात येतो.  फ्लोरल वीकेंडदरम्यान येथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी येथे वाईन, स्पाईस्ड हॉट चॉकलेट आणि पारंपारिक कहवा दिला जातो. 



येथे एक विशिंग वेल गार्डनही आहे. येथील विहीरीत नाणे टाकून स्वत:ची इच्छा व्यक्त केली जाते. सगळ्या येणाऱ्या टुरिस्टना या खेळात सहभागी व्हायचे होते. विहीरीत नाणे टाकणे प्रत्येकाला जमत नाही. दरम्यान, अजय पिरामल नाणे टाकण्यात यशस्वी राहिला होता.