मुंबई : संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली, असं म्हणत जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आगपाखड केलीय. 
 
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपने मिळविलेला विजय हा 'मुनी आणि मनी'मुळे होता... जैन मुनी हा अतिरेकी असून त्याला ठेचला पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी नुकतीच मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेत केली होती.
 
त्यावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुंबईवर राज्य केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण, हा तुझ्या आईने तुझ्यावर संस्कार केले नाहीत का? मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का? खबरदार, जर आमच्या वाट्याला जाल तर! हमको छेडोगे, तो हम तुमको छोडेंगे नही, असा इशारा सूरसागर यांनी गुजरातमधून दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो धर्म अहिंसेचा पुजारी आहे. त्या जैन समाजातील लोकांच्या मंदिरासमोर मांस शिजवून खाताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुमच्यात जर इतकी हिम्मत असेल तर मशिदीसमोर डुक्कर टाकून दाखवा? असं म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. 


संजय राऊतसारखा माणूस विष कालविण्याचे काम करीत आहे. वर स्वर्गात बाळासाहेब हा तमाशा पाहत असतील. त्यांना किती वाईट वाटत असेल. ते खाली येऊ शकले असते तर संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला प्रथम ठेचला असता... गुटखा खाऊन कोणी जर इशारे देत असेल तर तो नेता होऊ शकत नाही, अशीही टीका त्यांनी राऊतांवर केलीय. 


जर आमच्यामुळे भाजपला विजय मिळाला असेल तर तुम्ही यापूर्वी जे विजय मिळविले ते काय गुंडागर्दी आणि तलवारीच्या धाकावर मिळविले का? असा प्रश्नदेखील त्यांनी सेनेला विचारलाय.