मुंबई : राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार राज्यांना लस मिळायला हवी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :


- राज्यात लसीचा तुटवडा होऊ लागला आहे.
- केंद्र सरकारने लसीचा पुरवठा लोकसंख्या आणि त्या राज्यातील प्रादुर्भावाच्या प्रमाणात व्हायला हवा
- पण तसे होत नाही
- आम्ही याबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, राजेश टोपे संपर्कात आहेत
- सांगली जिल्ह्यात २ लाख ६४ हजार मिळाल्या, आता केवळ 4 हजार लसी शिल्लक आहेत
- १२.५ कोटी लोकसंख्या आणि गुजरात ६ कोटीच्या आसपास त्यामुळे या दोन राज्याची तुलना होऊ शकत नाही
- उत्तर प्रदेशात लसी कमी दिल्या हा केंद्राचा प्रश्न आहे
- गुजरातपेक्षा उत्तर प्रदेशात लसी जास्त द्यायला हवी होती.
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लसीचा पुरवठा कमी आहे अशी ओरड सुरू आहे.
- फडणवीसांना जर माहित आहे कोणत्या जिल्ह्यात लसी उपलब्ध आहेत तर त्याची माहिती त्यांनी द्यावी
- लसी उपलब्ध आहेत आणि आम्ही देत नाहीत असं आम्ही का करणार
- फडणवीसांनी राज्य योग्य असेल तरी दिल्लीच्या बाजूने बोलणे योग्य नाही
- आकडेवारी काय सांगते ते बघा
- आमच्याकडे लसी शिल्लक असती तर लसीकरण आम्ही बंद केलं नसतं
- फडणवीस महाराष्ट्रातील असून महाराष्ट्राबरोबर भांडत आहेत.
- केंद्राशी किमान भांडू नका, पण त्यांच्याकडे आग्रह तरी धरा
- मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला
- आपल्याला निर्णय मान्य नसेल तर वर जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.


जावडेकर यांच्या टीकेवर उत्तर


- सरकार कधी जाईल याची वाट पाहणार्‍या शक्ती या सगळया मागे आहेत का?
- अजून दोन तीन दिवस थांबा अशी भाषा भाजप नेते करत आहेत.
- हे पत्र वाचलं तर त्यात तथ्य नाही हे लक्षात येते 
- भाजपचे नेते बोलतात अणि नंतर एनआयएकडून काही माहिती बाहेर येते. त्यामुळे तपास सुरू आहे की राजकारण कळत नाही.
- ज्याच्यावर खूनाचा आरोप आहे, स्फोटके भरलेले गाडी ठेवली हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर आरोप आहे तो काय बोलतो तेच बाहेर येतंय
- आरोप असलेल्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा
- तपास स्फोटकांचा, तपास खूनाचा पण चर्चा वेगळीच होते 
- वाझेच्या बरोबर कोण आहे, म्होरक्या कोण आहे त्याला का अटक का होत नाही.
- भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ती सात दिवसात करायची असते इथे तर किती तरी महिने झाल्यावर असे आरोप केले जातेय
- इथे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नको त्या चर्चा केल्या जात आहेत
- जीएसटी परतावा कमी दिला बोलायच नाही का?
- केंद्राने अत्याचार केले तर बोलायच नाही का?- तुम्हाला राज्य सरकार यंत्रणा, कोरोनाकडे लक्ष नाही, सत्तेशीवाय बाहेर असणारे सतत सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळेल असे स्वप्न बघतात.
- अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी झाल्यावर त्यांच्यावर ठपका असणार नाही
- त्यानंतर अनिल देशमुख लवकर मंत्रिमंडळात दिसतील
- सीबीआय चौकशीनंतर आमचा पक्ष त्यांचा विचार नक्की करेल
- विदर्भातील ते आमचे प्रमुख नेते आहे