मुंबई: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. साधारणत: एखादा नवीन चित्रपट किंवा रंजक प्रसंगांवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत असतात. नुकताच येऊन गेलेला हॉलिवूडचा Avengers Endgame किंवा गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर  JCB excavators हा नवा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकजण सोशल मीडियावर JCB ची मिम्स पोस्ट करताना दिसत आहेत. मात्र, हे सगळे का घडत आहे, याचे नेमके कारण अद्याप कोणालाही ठाऊक नाही. 


काही दिवसांपूर्वी यूट्युबवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हीडिओमुळे हा ट्रेंड सुरु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा व्हीडिओ छत्तीसगढचा आहे. तेथील एका लग्नात नवरा मुलगा घोड्याऐवजी जेसीबीवरून लग्नमंडपात पोहोचला. तर आणखी एका व्हीडिओमध्ये जेसीबी मशीन जमीन खोदत असताना रिकामटेकड्या लोकांची गर्दी जमल्याचे दिसत आहे. या व्हीडिओला यूट्यूबवर प्रचंड हिटस् मिळाले होते. 


यानंतर फक्त यूट्युबच नव्हे तर फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सर्वच सोशल प्लॅटफॉर्मसवर #jcbkikhudayi या हॅशटॅगने मिम्स व्हायरल होत आहेत. परंतु, या सगळ्याची नेमकी सुरुवात कुठून झाली, हा प्रश्न अजूनही अनेकांना सतावत आहे.