शरद यादवांनी घेतली भुजबळांची भेट, दोन ओबीसी नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण
मुंबई : जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन ओबीसी नेत्यांची भेट झाल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय.
(हे पण पाहा: 'महाराष्ट्रात आगामी काळात मोठे बंड' - शरद यादव)
तर, शरद यादव यांनी लालुप्रसाद यादव यांचीही भेट घेतली. वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास शरद यादव यांनी ही भेट घेतली.
यानंतर पत्रकारांसोबत बोलताना शरद यादव यांनी म्हटलं की, "संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. देशभरात भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. संपूर्ण देश अस्वस्थ आहे तशी महाराष्ट्रात शिवसेनाही अस्वस्थ आहे. इतिहास साक्ष असेल तर महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड होईल."