जिओ चालत नाहीये, दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये अंबानी कुटुंबियांना सवाल...
कुणी विचारला असा सवाल
मुंबई : यंदा बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरू आहे. सगळेचजण लग्नबंधनात अडकत आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्राच्या नावाची खूप चर्चा झाली. आता देशातील सर्वात मोठं लग्न होणार आहे. मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीचं 12 डिसेंबर रोजी उदयपुरमध्ये होत आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने 1 डिसेंबर रोजी मुंबईत रिस्पेशन झालं. या रिसेप्शनला मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. यावेळी मीडियाला कुटुंबाने पोझ देताना दिसले.
या दरम्यान बिझनेसमन अंबानी यांना काही फोटोग्राफर्सने मस्करीत प्रश्न विचारले. ते प्रश्न असे होते की, ऐकताच सगळ्यांना हसू आवरलं नाही. फोटोग्राफर्सनी प्रश्न विचारला की, सर जियो नही चल रहा.... हे ऐकताच घरातील सगळी मंडळी मुकेश अंबानी यांच्याकडे पाहून हसू लागले.
या प्रश्नाला संपूर्ण अंबानी परिवार हसत सामोरे गेले. दीपवीरच्या रिसेप्शनला अनेक कलाकार उपस्थित होते. आता या लग्नांपाठोपाठ ईशा अंबानीच्या लग्नाची गडबड सुरू होईल.