मुंबई : आता बातमी आहे जिओचं सिमकार्ड वापरणा-यांसाठी महत्त्वाची आहे. गेल्या 5 ते 6 तासांपासून डाऊन असलेलं जिओ नेटवर्क अखेर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुपारपासून जिओच्या नेटवर्कची समस्या अनेक ग्राहकांना होत होती. त्यामुळे फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी अनेक अडथळे येत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारपासून मुंबईसह उपनगरातील जिओचं नेटवर्क गेल्यानं अनेकांचे हाल झाले. तरुण मंडळी हवालदील झाली. तर अनेकांची कामंही रखडली होती. अखेर दिवसाच्या शेवटी हळूहळू ही सेवा पूर्ववत होत असल्याची माहिती मिळाली आहे. 


मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये जिओचं नेटवर्क सुरळीत सुरू झालं आहे. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान नेटवर्क बंद होतं. त्यानंतर जिओ नेटवर्क सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


जिओचं नेटवर्क डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. तर जिओ डाऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा एअरटेल आणि वोडाफोनला काही काळासाठी का होईना भाव मिळाला.