Maharashtra politics  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. विनयभंगाच्या गुन्ह्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल, पण 354 या विनयभंगाच्या गुन्ह्याला आक्षेप असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.आव्हाडांच्या राजीनामा स्वीकारण्याबाबत पवारांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलीय. 


आव्हाडांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा अजित पवार यांचा आरोप


विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. आव्हाडांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामागचा खरा सूत्रधार कोण, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.  


काय आहे नेमकं प्रकरण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.  या गर्दीतून वाट काढत निघालेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाटेत आलेल्या महिलेच्या खांद्याला धरून हातानं बाजूला केले. आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकारी असलेल्या रिदा रशीद यांनी केला. त्यांच्या तक्रारीवरून आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.