MLA Jitendra Awhad Resign: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज आमदारकीचा राजीनामा ( Resign) दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगचा गुन्हा (Crime of molestation) दाखल केल्यानंतर आता कळवा-मुंब्रामधील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. (Ruta awhad said will move to court against maharashtra police for filing case against jitendra awhad)


काय म्हणाल्या ऋता आव्हाड (Rucha Awhad) ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्या (BJP) आहेत का?, असा सवाल ऋता आव्हाड यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपचं कोणीही आलं नव्हतं. त्या महिला एकट्या तिथे उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी होती. त्यावेळी आव्हाड साहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला, असंही ऋता आव्हाड यावेळी म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री देखील त्यावेळी 15 फूटावर उपस्थित होते, असंही ऋता आव्हाड (Ruta Awhad) म्हणाल्या आहेत.


एखादा गुन्हा दाखल करताना त्याला काही गाईडलाइन्स असतात. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो?, असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मर्द असाल तर सत्ताधाऱ्यांनी कामातून उत्तर द्यावं. बाईला पुढे करुन लढाई लढू नये, असंही ऋता यांनी शिंदे भाजपला (Maharastra Politics) सुनावलं आहे.


आणखी वाचा - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा


दरम्यान, आपली लोकशाही एवढी खालच्या पातळीवर गेली आहे. एखाद्याला कमी दाखवायचं असेल तर महिलेचा वापर केला जातोय, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही कोर्टात जाऊ... पोलिसांनी गुन्हा सिद्ध करून दाखवावा, असं खुलं आव्हान देखील त्यांनी (Jitendra Awhad News) यावेळी दिलं आहे.