मुंबई : फोर्ट भागातील जीपीओसमोर भानूशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून मृतदेह ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आला आहे. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी मुंबईत अशप्रकारे अनेक इमारती, इमारतींचा भाग कोसळ्याच्या घटना घडतात. मात्र दरवर्षी संबंधितांवर याबाबत कारवाई करु असं आश्वासन देण्यात येतं आणि त्यानंतर मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. याप्रकरणी, ज्या बिल्डिंग धोकादायक आहेत, त्याबाबत महिना-दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, तसंच रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.


मुंबईत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला असून उरलेला भाग शाबूत आहे. मात्र उरलेला भागही धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाकडून रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.