जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा! महिलांसाठी प्रशस्त वसतीगृह उभारणार
नववर्षाचं औचित्य साधून म्हाडाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाला हात घालण्यात येत आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. नववर्षाचं औचित्य साधून म्हाडाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाला हात घालण्यात येत आहे. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
म्हाडाच्या माध्यमातून 1 हजार महिलांसाठी वसतीगृह सुरू करण्यात येणर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हे वसतीगृह सुरू करण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला मुंबईत कामानिमित्ताने येत असतात. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या राहण्याची अडचण होते. त्यामुळे ताडदेवला म्हाडाच्या खुल्या भूखंडामध्ये हे वसतीगृह तयार करण्यात येणार आहे. साधारण 500 खोल्यांचे हे वसतीगृह असणार आहे. प्रत्येक खोलीत 2 महिला राहू शकतील अशी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
वसतीगृह सर्व सुविधायुक्त असणार आहे. याचा मुंबई बाहेरच्या महिलांना नक्कीच फायदा होणार आहे.