आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक
मध्य, हार्बर, पश्चिम अशा तिनही मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : वर्षाच्या अखेरच्या दिवशी प्रवाशांना 'जम्बो ब्लॉक' ला सामोरे जावे लागणार आहे. मध्य, हार्बर, पश्चिम अशा तिनही मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. त्यामूळे 'थर्टी फर्स्ट' एन्जोय करण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की बघा.
हार्बर मार्गावर
हार्बर रेल्वे मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरुन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
पश्चिम मार्गावर
पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत जम्बो मेगाब्लॉक घेतला जाईल.बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
मध्य मार्गावर
सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सीएसएमटी दरम्यानच्या धिम्या मार्गावरील लोकल गाडया १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.
कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत ठाण्यात अप स्लो मार्गावरुन चालतील.
दिवा ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील.
विशेष लोकल
‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने रविवारी मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
या सेवा रद्द
ब्लॉक दरम्यान पनवेल-अंधेरी सेवा
सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३० वाजता पनवेल-बेलापूरहून सीएसटीएमच्या दिशेने सुटणाऱ्या सेवा
सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलला सुटणाऱ्या सर्व डाऊन ट्रान्सहार्बर लाइन
सकाळी ११.२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत ठाण्यासाठी पनवेलहून सुटणाऱ्या सर्व अप-ट्रान्सहार्बर गाड्या