पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; तर मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक; रविवारी घराबाहेर पडण्याआधी वाचून घ्या
रविवारी 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर (Western Railway) जम्बोब्लॉक असणार आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेनेही (Central Railway) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. याचं कारण या दोन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 5 तासांचा जम्बोब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवर इंजिनिअरिंग आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा ब्लॉक
रविवारी 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. बोरिवली-गोरेगावदरम्यान 5 तासांचा जम्बोब्लॉक असणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक असणार आहे. यादरम्यान स्लो ट्रॅकवरच्या ट्रेन बंद असतील. फास्ट ट्रॅकवरूनच स्लो गाड्या धावणार आहेत. ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बो ब्लॉक घेतला जाईल.
मध्य रेल्वेवर काय स्थिती?
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.
एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर 6व्या मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, असं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. .
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत -
- गाडी क्रमांक 11010 पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12124 पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
- ट्रेन क्रमांक 13201 पाटणा-एलटीटी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12126 पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 12140 नागपूर-सीएसएमटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 22226 सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे येथे 5 व्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेस ट्रेन्सला 10 ते 15 मिनिटं उशीर होईल.
- ट्रेन क्रमांक 11055 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11061 एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 16345 LTT-तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (PORT लाईन वगळून) सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
हार्बर लाइन ब्लॉक विभाग
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर लाइन ब्लॉक विभाग
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी हे मेगाब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात होणारा हा त्रास सहन करावा अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.