Kalawa Hospital Death: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका दिवशी 17 रुग्णांचे मृत्यू झाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनावर जोरदार टिका होऊ लागली आहे. यानंतर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक अनिरुद्ध माळगावकर ने यावर घटनेचा सविस्तर तपशील दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. अत्यावस्थ रुग्णांना आम्ही वाचवू शकलो नाही असे डीनने सांगितले.


आमच्याकडे एकूण 18 रुग्ण आले. एका 4 वर्षाच्या मुलाने करोसिन प्यायले होते, दुसऱ्याला साप चावला होता. एकाच्या डोक्याला खूप मार लागला होता. काहींचे लंग्स खराब होते. काहींचे हृदय खराब होते. यातील काही 4 ते 6 दिवस रुग्णालयात होते. यांना आम्ही वाचवू शकलो नाही असे अधिक्षकांनी सांगितले. 


रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले. 


अहवाल आल्यावर कारवाई- आरोग्यमंत्री 


दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  "गुरुवारी ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्याबाबतचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. त्यानंतर आता 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माझ्या अखत्यारित जे रुग्णालय आहे त्याचे शिफ्टिंग झाले आहे. त्यातील एकही रुग्ण या रुग्णालयात आलेला नाही. माझ्या सेवा सुरळीत चालू आहेत. या रुग्णालयात काय झालं याचा अहवाल आल्यावरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल असे आरोग्यमंत्री म्हणाले. 


जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड होणे हे माझ्यासारखा संवदेनशील आरोग्यमंत्री सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. 


ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यावर कारवाई करण्यात येईल. हे सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रथम कर्तव्य महाराष्ट्र शासनाचे आहे. ज्याच्यामुळे हे घडलं त्याच्यावर उचित कारवाई केली जाईल," असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिला आहे.