MLA Ganpat Gaikwad : महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यात गोळीबार करुन दोघांना जखमी केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना उल्हासनगर कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र आता गणपत गायकवाडांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांचा आता या प्रकरणाचा देखील तपास सुरु केला आहे.


 गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमधील द्वारली गावातील जमिनीवरुन गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्या जागेवर बांधलेली भिंत महेश गायकवाड यांनी पाडली होती. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासोबत राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.


उल्हासनगरमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप जमीन मालकाने केला आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.