आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : (Kalyan News) मराठी कुटुंबाला मारहाण, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, शेजाऱ्यांच्या घरावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयक्न यामागोमाग आणखी एका विक्षिप्त वृत्तीतून घडलेल्या घटनेनं कल्याण पुन्हा एकदा हादरलं आहे. कल्याणजवळील आंबिवली मोहने परिसरात भोंदू बाबाचं संतापजनक कृत्य समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील वाद, अडीअडचणींचा गुंता घेऊन तो सोडवण्यासाठी एक महिला त्या भोंदू बाबाकडे गेली होती. त्यावेळी अघोरी विद्येच्या नावाखाली या इसमानं मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कल्याण जवळील आंबिवली परिसरात सदर पीडित तरुणी राहते. तिला काही अडचणी असल्याने ती जवळच असलेला ओळखीचा भोंदू बाबा अरविंद जाधव याच्याकडे आपल्या नातेवाईकासह गेली होती. या भोंदू बाबाने नातेवाईकाला बाहेर थांबण्यास सांगितलं आणि संधी साधत त्यानं या मुलीशी अश्लील चाळे केले.


भोंदीबाबाचं हे कृत्य बघून मुलगी घाबरली. तिनं तताडीनं बाहेर पळ काढला. सदर घटनेनंतर पीडित मुलीने या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भोंदू बाबा अरविंद जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस या भोंदू बाबाचा शोध घेत असून त्याने आणखी काही महिलांसोबत असं कृत्य केलं आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या भोंदू बाबाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या पीडित मुलीने केली आहे. 


कल्याणमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क 


दरम्यान कल्याण-डोंबिवली परिसरात महिलांच्या छेडछाड, चोरी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर, कल्याण झोन-3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रात्रीच्या वेळी रस्ते, बागा आणि सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या नशेखोरांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा? 


गुन्हेगारांना थेट ठिकाणावरच पकडून त्यांना पोलिसी शिक्षा देण्यात येत असून, अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून चौकशीसह कडक कारवाई केली जात आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांनी दिलासा घेत पोलिसांचे कौतुक केले आहे. मात्र अनेक वेळा राजकीय लोकांचा हस्तक्षेप होत होत असल्याने पोलिसांना कारवाई करणे अवघड जात होतं त्यासाठी आज कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन या मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला.