कल्याण तरुणीला मारहाण प्रकरण! दबाव वाढल्यानंतर पोलिसांना जाग; 12 तासानंतर दोन आरोपींना घेतले ताब्यात
कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता
कल्याण : कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. मारहाण करतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला गेला.
सर्वपक्षीय महिला पदाधिकारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर आणि विविध ठिकाहून दबाव वाढल्या नंतर अखेर पोलिसांनी या मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे .सागर म्हात्रे आणि अविनाश पडवळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. फिर्यादी राहुल गाडेकर आणि बंटी प्रधान यांचा पोलीस जवाब नोंदवत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे कोळसेवाडी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
कल्याणमध्ये एका तरूणीला आणि दोन तरूणांना जमावाने बेदम मारहाण केली आहे. ही शुक्रवारी मध्यरात्री घटना घडली आहे.राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. शुक्रवारी मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत होती . तेव्हा रिक्षाचालकाने तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन संबंधित माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले.
मित्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर रिक्षाचालक आणि तरूणीच्या मित्रांमध्ये वाद झाला. तेव्हा जमावाने दोन तरूणांसह तरूणीला देखील मारलं आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पारिसरात काटेमानीवली नाक्यावर भररस्त्यात हा प्रकार घडला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.