COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रशेखऱ भुयार, झी २४ तास कल्याण : कल्याणच्या पंचक्रोशीत गंगाबाई आजी सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहेत. कारच्या मागच्या सीटवर बसण्याच्या वयात त्या कारच्या ड्रायव्हिंग सीटला बसतायत. गंगाबाई आजी बिनधास्त ड्रायव्हिंग करतात. 


गंगाबाई तशा कार शिकल्या दोन वर्षापूर्वी पण लॉकडाऊनमध्ये नातवाची कार घरीच होती. त्यामुळं या काळात त्यांचा कार चालवण्याचा चांगला सराव झाला. दहागाव परिसरात आजीची कार ड्रायव्हिंग चर्चेचा विषय झालाय.


आजींचा कार शिकण्याचा किस्साही गंमतदार आहे. आजींना बरं नसताना नातवानं त्यांना कार चालवाय़ला शिकणार का असं विचारलं. त्यावर आजी लगेच कार शिकायला तयार झाल्या. त्या उत्साहात त्या आजारपणही विसरल्या.



गंगाआजी धार्मिक आहेत. आजही त्या नित्यनियमानं योगासनं करतात. चाकोरीबाहेरची कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे आजींनी दाखवून दिलंय.