कल्याण येथे रुळांची पाहणी करताना लोकलच्या धडकेत विभागीय अभियंता ठार
कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
मुंबई : धक्कादायक बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळांची पाहणी करताना ही दुर्घटना घडली.
कल्याणमधल्या पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करायला विमलकुमार राय गेले होते. मात्र पाहणी करताना लोकल आल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पाहणी करताना त्यांना लोकलची धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झालेयत. रेल्वे धडकेत मृत्यू त्यांचा झाला.