मुंबई : कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव प्रकरणी 3 फरार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावलीय. 


पोलिसांची पाच पथके सज्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केलीय. कमला मिलमधील मोजोस बिस्त्रो, वन अबव्ह या हॉटेल्सना शनिवारी आग लागली होती. यांत 14 जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तीन आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. 


लूकआऊट नोटीस


दरम्यान, हे आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीय. यासाठी देशातल्या सर्व विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आलाय.