दीपक भातुसे / मुंबई : कमला मिलमध्ये एफएसआय वापरात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. 


४०० ते ५०० कोटी रुपयांचा घोटाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमला मिलमध्ये २००७ साली आयटी पॉलीसीच्या अंतर्गत 95 हजार चौरस मीटरचा एफएसआय देण्यात आला. मात्र आयटीसाठी दिलेला हा एफएसआय इतर कामांसाठी वापरला. यात ४०० ते ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत केला. या सगळ्या घोटाळ्याची उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, नगररचनाकार आणि आर्किटेक यांची समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.


कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी


पाहा मुख्यमंत्री काय म्हणालेत?


- संपूर्ण कमला मिल बिल्डरच्या घशात घालण्याचं काम २००१ साली करण्यात आला
- हा सगळा मोठा घोटाळा आहे 
- म्हाडाला, महापालिकेला एक इंच जागा मिळाली नाही
- 2007 साली 95 हजार चौरस मीटर आयटीचा एफएसआय  दिला गेला
- मात्र आयटीसाठी दिलेल्या एफएसआय इतर कामांसाठी वापरला गेला
- या सगळ्या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि त्याचे पैसे वसुल केले जातील
- वन अबॉव्हमध्ये जीना होता, त्यावर स्टोअररुम करण्यात आले त्यामुळे लोक बाहेर पडू शकले नाहीत
- महापालिकेने आता ज्या ठिकाणी अशा नियमांचे भंग केला आहे तिथे कारवाई सुरू केली आहे
- अग्निशमन दलाची पाहणी सुरू आहे
- प्रत्येक रेस्टॉरंटचे ऑडीट केलं जातंय
- ज्या-ज्या ठिकाणी अवैध बांधकाम आहे ते पाडलं जातंय


आमदार आशिष शेलार


- कमला मिल जागेत ४०० ते ५०० कोटींचा घोटाळा झाला आहे
- गिरणी कामगारांना घरं द्यायची होत
- मात्र जागेच्या वापर बदलण्यात आला


मुख्यमंत्री फडणवीस


- गिरणी कामगारांची फसवणूक केली
- 1999 साली यातील ३० टक्के जागा गिरणी कामगारांना मिळणार होती
- मात्र ती जागा गिरणी कामगारांना दिली गेली नाही
- गिरणी कामगारांची जागा यांनी खाऊन टाकली
- यांनी सगळ्या मिल विकून टाकल्या, त्या विकासकाच्या घशात टाकल्या, त्याची चौकशी केली जाईल


शिवसेना आमदार सुनील प्रभू


- गिरणी कामगारांच्या घरावर नांगर फिरवला
- तेव्हा कोण मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री होते त्यांची नावं जाहीर करावी


मुख्यमंत्री फडणवीस


- मी नावं घेण्याचं कारण नाही अख्या दुनियेला माहीत आहे हे कुणी केलंय
- तेव्हा कुणाचं सरकार होतं ते सगळ्यांना माहीत आहे


मुख्यमंत्री फडणवीस


आम्ही चौकशीला भीत नाही
चार वर्ष काय झोपला होता काय?
आगीचा प्रश्न होता, त्याला कोण जबाबदार आहे
कोणी परवानगी दिली, त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली असेल तर त्याचे उत्तर द्यावे