मुंबई : मुंबई महानगरपालिका आज अभिनेत्री कंगना रानौतच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करणार होती. आता मनपाने ही कारवाई तुर्तास थांबवली आहे. तसेच कंगनाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कंगनाच्या याचिकेवर स्थगिती आणण्यात आली आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.



 कंगनाने मुंबईचे पीओके असे वर्णन केले होते. त्यानंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनाला मात्र शिवसेनेची पंगा घेणं महागात पडलं आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे.


कंगनाने या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ऑफिसमध्ये पूजेचे फोटो शेअर केल्यानंतर कंगनाने म्हटलं की, 'ती माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. बाबर आज तिथे आले आहेत, राम मंदिर पुन्हा तुटेल पण बाबर लक्षात ठेवा हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.'



कंगनाच्या विषयावर बोलू नका असं मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश आले आहेत. कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा भाजपने आरोप केला आहे. कंगना प्रकरणावर मात्र शिवसेनेचे मौन धरलं आहे.