मुंबई : आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. एका मुलाखतीत कंगना रनौतने देशाच्या स्वतंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन आता कंगनावर विविध क्षेत्रातून टीका होऊ लागली आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा भाजप खासदार वरुण गांधी यांनी समाचार घेतला असून स्वतंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा अपमान असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाचं वादग्रस्त व्यक्तव्य


खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने 1947 साली मिळालेलं स्वतंत्र्य भिक होतं, देशाला खरं स्वतंत्र्य 2014 मध्ये मिळालं असं वक्तव्य केलं. 


सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत बोलायचं झाल्यास, त्यांना माहित होतं की स्वातंत्र्यासाठी रक्त सांडायचं आहे, पण भारतीयांकडून भारतीयांवर वार होणार नाही हे लक्षाय ठेवायला हवं, त्यांना स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत चुकवली, पण ते स्वतंत्र्य नाही तर भिक होती, देशाला खरं स्वतंत्र्य मिळालं तर ते 2014 मध्ये मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य कंगना रनौतने केलं आहे.


देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने या मुलाखतीत म्हटलं आहे.


वरुण गांधी यांची टीका


कंगनाच्या या वक्तव्यावर भाजप खासदार वरुण गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अवमान. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?'


का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।

इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z


 


— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021


कंगनाचा पद्म पुरस्कार रद्द करावा


कंगनाच्या वक्तव्याचा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही समाचार घेतला आहे. कंगना राणावतचा तिचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. सन्मानीय राष्ट्रपती महोदयांनी कंगना राणावतला नुकताच पद्म पुरस्कार प्रदान केला, त्यानंतर कंगना राणावत हिने अत्यंत बेजबाबदर, निराधार आणि स्वातंत्र्य योद्धांचा अपमान करणारे विधान केलं आहे. 


त्याचा निषेध करते, प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी कंगना राणावतने 1947 च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन समर्पित करणाऱ्या योद्धांचा अपमान केला आहे, स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला आहे, त्यामुळे तिचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.