मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओच्या आता केवळ स्मृती उरणार आहेत. कपूर कुटुंबीयांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.  स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला. शो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. आता हा स्टुडिओ विकणे योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.


गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर 'सुपर डान्सर' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे  आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता.