मुंबई : कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांनी ४०० जणांची फौज उभारली असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अमित शाह यांच्याकडून सर्वप्रकारचे प्रयत्न सुरू आहेत.


विधानसभा मतदारसंघाची तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फौजेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची तयारी करण्यात येणार आहे. मतदार याद्यांवर देखील जोर दिला जाणार आहे. थेट गुजरातहून तज्ज्ञांची फौज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून येणार आहे. 


राज्य जिंकून घेण्यासाठी भाजप सज्ज


काँग्रेसच्या ताब्यात असणारे राज्य जिंकून घेण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. यासाठी मोठी प्रचार मोहीत हाती घेण्यात आली आहे. यासाठी निवडणूक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील लहान घटनांवरही नजर ठेवण्यात येणार आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत


गुजरातहून ४०० तज्ज्ञ राज्यात येणार असून त्यापैकी २५० जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. सध्या राज्यात असणार्‍या भाजपच्या ‘वॉर रुम’सोबत ही टीम कार्यरत राहणार आहे. उर्वरित १५० जण तज्ज्ञ राज्यातील घडामोडीवर नजर ठेवून राहणार आहेत. 


नजर ठेवण्यासाठी ४०० जणांची टीम


शहर आणि ग्रामीण भागातील घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी ४०० जणांची टीम कार्यरत राहणार आहे. सध्या राज्यात वेगवेगळया जनमत चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष सरस असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे, तसेच कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


समाजमाध्यमांचा वापर वाढविण्यात येणार


सत्तारुढ काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करण्याचे आदेश अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना २  महिन्यापूर्वीच बजावले आहेत. काँग्रेसचे अपयश जनतेसमोर नेण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे आदेश देऊनही अपेक्षित परिणाम राज्यात दिसत नाहीत. यामुळे समाजमाध्यमांचा वापर वाढविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.