मुंबई : कर्नाटकात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. त्याताच काँग्रेसचे एक आमदार रात्री अचानक गायब झाले होते. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा सुरु असताना गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते कर्नाटकमधून कोणाला न सांगता मुंबईत उपचारासाठी पोहोचले. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.



काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि जेडीएसने कोणताही धोका नको म्हणून आपल्या आमदारांना कर्नाटकमध्ये एका हॉटेलवर ठेवले होते. मात्र, कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील काल रात्रीपासून अचानक गायब झाले होते. श्रीमंत पाटील हे इतर काँग्रेस आमदारांसह रिसॉर्टवर होते. तिथून ते वैयक्तिक कामाचे कारण देत कालपासून गायब झाले होते. कुमारस्वामी सरकारची आज विश्वासदर्शक ठरावाची कसोटी आहे. त्यात आणखी एक आमदार कमी झाल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. 


१३ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटल्याची चर्चा होती. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसला आणखी एक खिंडार पडले आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, गायब आमदार मुंबईत उपचार घेत असल्याचे फोटो पुढे आला आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.