सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : केईएम रूग्णालयातील ईसीजी 'त्या' अपघातामुळे चिमुकल्या प्रिन्सला हात गमवावा लागला आहे. प्रिन्सचं हतबल कुटुंबीय आता न्यायाची अपेक्षा करत आहेत. केईएमच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर याला हृदयविकारासाठी बुधवारी दाखल केले होते. वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आणलेल्या प्रिन्सला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयाच्या ठोक्यांवर देखरेख करण्यासाठी ईसीजी यंत्रही त्याला लावले होते. या ईसीजी यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तारांनी पेट घेतला. त्यामुळे प्रिन्सच्या खाटेवरील चादरीलाही आग लागली. यामध्ये त्याच्या खांद्याला, कानाला आणि कमरेच्या भागाला भाजले ह्या घटनेनंतर सोमवारी हाताची सर्जरी करण्यात आली परंतु त्या सर्जरी नंतर प्रन्सिचा एक हात निकामी झाला यापुढे चिमुकल्या प्रिन्सला आपल आयुष्य एका हाताने घालवावे लागेल. याचे दुःख प्रिन्सच्या पालकांना आहे. मुल बरं व्हायला हवे म्हणून मुंबईला आलेल्या कुटुंबातील सदस्यांवर यामुळे आभाळ कोसळले आहे. 


सोमवारी प्रिन्सचा हात काढल्यानंतर मात्र वडील पन्नेलाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. जबाब नोंदवून पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३३८ नुसार गुन्हा नोंदवला


ईसीजी यंत्राने पेट घेतल्याची घटना प्रथमच रुग्णालयात घडली असून याची चौकशी करण्यात येईल या घटनेची चौकशी करण्यासाठी पालिकेने चौकशी समिती नेमली आहे या प्रकरणी हॉस्पिटलने कॅमेरा समोर प्रतिक्रिया नोंदवायला नकार दिला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आज या चिमुकल्या प्रिन्सला हात गमवावा लागला त्यामुळे  आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे आमच्या मुलांच भविष्य उध्वस्त झाल्या त्यामुळे कडकड कारवाईची मागणी कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.