मुंबई : भाजपाची चौथी यादी जाहीर झाली आहे, धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचं यादीत नाव नसलं तरी रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यातही आणखी एक धक्कादायक म्हणजे विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचाही पत्ता कट करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तिकडे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे समर्थक आज शेवटचा निर्णय घेण्यासाठी जमले असताना, रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे, तेव्हा यावर एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


भाजपच्या चौथ्या यादीत मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, तुमसरमधून प्रदीप पडोळे, नाशिक पूर्वमधून अॅड. राहुल ढिकले, बोरिवलीतून विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे, घाटकोपर पूर्वमधून पराग शहा, तर कुलाब्यातून राहुल नार्वेकर यांना भाजपाने तिकिट दिलं आहे.