मुंबई : खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. यानंतर शिवसैनिक देखील पोलीस स्टेशन बाहेर जमले असून किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याच्या भेटीला आल्यानंतर शिवसेनेने भाजपवर आरोप केले आहेत. राणा दाम्पत्याच्या मागे भाजपचा हात असल्याची टीका शिवसेनेकडून होत आहे.


नवनीत राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला बेकायदेशीरपणए अटक केल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.