मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची कोट्यवधींची संपत्ती आज ईडीने जप्त केली आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. 'पुष्पक ग्रुप'ची संपत्ती आज ईडीने जप्त केली आहे. एकूण 6 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. किरिट सोमय्या यांनी झी 24 तास सोबत बोलतांना मोठा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई महापालिका लुटण्याचा अधिकार आधी उद्धव ठाकरे यांनी श्रीधर पाटणकर यांना दिले होते. कॉन्ट्रॅक्टरकडून कसे पैसे येतात. बंद कंपन्यामधून मनी लॉन्ड्रिग केलंय. श्रीधर पाटणकर यांच्या खात्यातून पैसे कोणाच्या खात्यात गेले हे राज्यातील जनतेला जेव्हा कळेल ना उद्धव ठाकरे साहेब उत्तर देऊ शकणार नाही.' असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे. (kirit somaiya serious allegation on CM Uddhav Thackeray Brother In Law)


'सगळा हिशोब समोर येणार. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर कोणाला मेहनतच करावी लागणार नाही. कोणाला किती गेले त्यांनी याचा हिशोब द्यावा. पुढे बघा उद्धव ठाकरे यांचे डर्टी डजन सगळ्यांचा हिशोब घेणार. बाहेर येण्याची सुरुवात झाली आहे.' असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.