मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी मिळाली असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण लोकल ट्रेनमधून प्रवास करत किरीट सोमय्या यांनी प्रवाशांशी संपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. काल किरीट सोमय्या यांनी ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे 8.30 ते 10.30 दरम्यान मुलुंड ते विद्याविहार असा प्रवास करत लोकल प्रवाशांशी चर्चा केली. भाजप-शिवसेना यांच्यामध्ये लोकसभा जागा वाटपाची चर्चा पडद्यामागे सुरू आहे. किरीट यांनी ज्या प्रकारे जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे त्यावरून काही जागांवर सहमती झाल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान्य मुंबईत विद्यामन खासदार किरीट सोमय्या हे नेहमीच शिवसेनेच्या रडारवर राहीलेले आहेत. तेव्हा किरीट सोमय्या यांचे लोकलमधील जनसंपर्क अभियान लक्षात घेता शिवसेनेची याला मूक संमती दिली आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.


कोण आहेत किरीट सोमैया? 


डॉ. किरीट सोमैया हे मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील होते. किरीट सोमैया यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्‍त्रामध्ये पीएचडी केली आहे. किरीट सोमैया यांचा जन्‍म १२ फेब्रुवारी १९५४ ला झाला होता. १९९५ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. या दरम्यान १९९५ ते १९९९ पर्यंत ते भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. १९९९ मध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. किरीट सोमैया हे सीए देखील आहेत. १९७९ मध्ये त्याने सीएची परीक्षा पास केली होती. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्‍त्रामध्ये पीएचडी केली.