मुंबई : किरीट सोमय्या यांना कोर्टाने धक्का दिला आहे. सोमय्यांना अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे. INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात किरीट सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय होणार आहे. विक्रांत बचावच्या नावाखाली जमा केलेल्या निधीचा किरीट सोमय्यांनी अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, किरीट सोमय्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात अपील करणार आहेत.



किरीट सोमय्या यांनी  मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज जवळपास दोन तास सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाचा असं म्हणणं आहे की, अकरा हजार रुपये चे जमा करण्यात आले होते ते कुठे जमा केले त्या संदर्भात काहीही खुलासा केला गेला नाही. म्हणून किरीट यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. मात्र यासंदर्भात आम्ही कायदेशीर बाबी तपासून लवकरच मुंबई हाय कोर्टामध्ये अपील करु.' अशी माहिती किरीट सोमय्या यांचे वकील पवनी चड्डा यांनी दिली आहे.


सराकरी वकिल प्रदीप घरत यांनी माहिती देतांना म्हटले की, INS विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे पक्षाला दिले गेले. अपहार 1 पैशांचा असो की 1 कोटींचा तो अपहारच आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली आहे.


सोमय्यांनी लोकांकडून 58 कोटी गोळा केले पण हा निधी नंतर राजभवनानकडे सोपवलाच नाही, अशी माहिती राजभवनानेच दिल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी पैसे गोळा केले. मात्र त्याची पावती कोणालाही दिली नाही. असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनीही किरीट सोमय्या यांना जामीन मिळू नये अशी मागणी केली आहे.