मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार आरोप केले. पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकॉन फेज वन व टूचे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले गेले. पर्यावरण नियम झुगारून प्रकल्प उभे केलेत. यात आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे. ईओडब्ल्यूने नील सोमेय्याला अटक करावी. भ्रष्टाचारावर बोलायचं व आपले भ्रष्टाचार लपवायचं असा हा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली. 


किरीट सोमय्या यांचं उत्तर


यावर आता भाजप नते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मी कुठल्याही बेकायदेशी व्यवहारात सहभागी नाही, पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड काळातील घोटाळ्यावर का बोलत नाहीत. सुजीत पाटकर आणि प्रवीण राऊत यांच्यावर का बोलत नाहीत असा सवाल सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. 


२०१७ साली सामनातून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचं नाव घेतलं जात आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध १० खटले दाखल केले आहेत, मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, कोणत्याही भ्रष्टाचारात गुंतलेलो नाही असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 



संजय राऊत यांचा दलाल म्हणून उल्लेख
 उद्धव ठाकरे आणि परिवाराची रोज काही तरी एक प्रकरण काढत असतात, काही तथ्य आहेत त्यात, आतापर्यंत त्यांच्याकडून कोणी सांगायला आलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो. तो जो कोण बोलतोय ना दलाल, त्याला मराठीत भXवा म्हणतात. त्यांना असं म्हटलं की ठाकरे कुटुंबियांनी अलिबाग जवळच्या कोरलाई गावात १९ बंगले बांधलेत, ही बेनामी प्रॉपर्टी आहे, असं त्याने म्हटलं आहे.


माझं त्या दलालाला आव्हान आहे, आपण चार बसेस करु आणि त्या एकोणीस बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ  आपण त्या बंगल्यात सर्व पत्रकारांची पिकनिक काढू, जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि जर ते बंगले दिसले नाहीत, तर त्या दलालाला जोड्याने मारेन, अख्खी शिवसेना जोड्याने मारले. खोटेपणाचा कळस करताचा, भंपकपणा करायचा, कुठे आहेत ते बंगले, चला जाऊयात, पार्टी करु, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.