मुंबई : Kirit Somaiya's injury Is artificial? : किरीट सोमय्या यांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणी राज्याचे गृहखातं सत्यता पडताळणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. सत्यता पडताळण्यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली जाणार आहेत. किरीट सोमय्याना झालेली जखम कृत्रिम आहे का याची शंका पोलिसांना आहे. जखम खरंच हल्ल्यातून झाली का याची पडताळणी पोलीस करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 'झी 24 तास'ला ही सूत्रांनी माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला  शिवसेनेने केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीची काच यामुळे फुटली. ज्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. मात्र, सोमय्यांना झालेली जखमी कृत्रिम आहे का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. 


दरम्यान, सोमय्या यांच्या चालकाविरोधातही भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात आलेल्या सोमय्या याच्या चालकाने भरधाव गाडी चालवून दोघांना किरकोळ जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.