मुंबई : 'शिवसेनानेते संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजित पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादाने कोविड सेंटरची कंत्राटं मिळवली. तसेच कोविड संसर्गीत रुग्णांच्या जिवाशी खेळ केला. या प्रकरणात सुजित पाटकर यांनी करोडो रुपयांचा धंदा केला आहे. त्याचे पुरावे आम्ही तक्रारीतसोबत जमा केले आहेत. अशी माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'जी कंपनी अस्तित्वातच नाही. तिच्या नावे बनावट कागदपत्र जमा करून सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्तांनी 13 कंत्राटं दिली. महापालिका आयुक्तांना कोणाचा आदेश होता हे सध्यातरी माहिती नाही. तिकडे पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्यांनाच कंत्राटं देण्यात आली. हजारो कोविड रुग्णांचं मोठं नुकसान झालं आहे. या विरोधात फौजदारी कारवाई करावी. ही अधिकृत तक्रार आम्ही दाखल केली आहे. 7 दिवसांमध्ये आझाद मैदान पोलिसांनी एफआयआर दाखल करावी. अन्यथा आम्ही आझाद मैदान कोर्टात खटला दाखल करू' असेही किरिट सोमय्या यांनी म्हटले आहे.


उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शिवसैनिकांना पैसेच कमाऊन द्यायचे होते तर, कोविड रुग्णांचा आधार का घेतला? त्यांच्या जिवाशी का खेळ केला? माझ्याकडे असलेल्या कागदपत्रांचे पुरावे खोटे असतील तर, मला जेलमध्ये टाका. परंतू या प्रकरणावर कारवाई करावी अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली आहे.