लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पाहा सोन्याचे दर, किती रुपयांची घसरण ?
सोन्याचे चांदीच्या किंमती जाणून घ्या
मुंबई : सोन्याचे दर (Gold Rate) महागाई मोजण्याचे सर्वोत्तम मानक राहीलंय. सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) ही गुंतवणूकदारांसाठी महत्वपूर्ण मानली जाते. आजपासून पुढचे 15 दिवस राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लागू होणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी सर्वसामान्य ग्राहक घराबाहेर पडताना दिसणार नाही. पण सोन्याचे चांदीच्या दरात किती चढउतार आला हे सर्वजण आवर्जुन पाहतात.
भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति 10 ग्रॅम 45,700 रुपये आहे. काल ही किंमत 45,710 रुपये होती. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,860 रुपये आहे. काल ही किंमत 49,870 इतकी होती. आज सोन्याच्या किंमतीत 10 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,750 रुपये आहे.
देशात 100 ग्रॅम चांदीची किंमत (Silver Rate)आज 6,760 रुपये आहे. काल ही किंमत 6,630 रुपये होती. आज या किंमतीत 130 रुपयांनी वाढ पाहायला मिळतेय. मुंबईत चांदीची किंमत 6,760 रुपये आहे.