नवी दिल्ली: बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवींच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्यांचे चाहते अद्यापही सावरले नाहीत. आपले सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्व यामुळे अनेकांसाठी जीवंतपणीच एक दंतकथा बनलेल्या श्रीदेवी आता आपल्यात नाहीत. अर्थात, जाताना त्या आपल्यासोबत अनेक किस्से आणि आठवणी मात्र नक्कीच ठेऊन गेल्या आहेत. पण, त्यांच्या किश्श्यांसोबत सध्या चर्चा सुरू आहे ती त्यांच्या मालमत्तेची. तर, किती होती श्रीदेवींची मालमत्ता?


संपत्तीत पतीची भागीदारी नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचीत तुम्हाला माहिती नसेल. श्रीदेवी या आपल्या अरबोपती पतीच्या मालमत्तेशिवायही वेगळी स्वतंत्र मालमत्ता बाळगून होत्या. निधनासमयी असलेल्या ५४व्या वर्षी त्या सुमारे २५० कोटी रूपयांच्या मालकीन होत्या. यात त्यांचे ३ अलिशान बंगले (जुहू, वर्सोवा आणि लोखंडवाला येथे) आणि ७ महागड्या गाड्यांचाही  समावेश आहे. सोबतच त्या लक्स आणि तनिष्क सारख्या २ जागतिक ब्रांडच्या एम्बेसडरही होत्या. बॉलिवूडमधील सूत्रांची माहिती अशी की, त्या एका चित्रपटासाठी कमीत कमी ३.४ ते ४.५ कोटी रूपये इतके मानधन घेत. असेही सांगितले जाते की, त्यांच्या संपत्तीत पती बोनी कूपरची कोणतीही भागिदारी नव्हती


२४७ कोटी रूपयांची संपत्ती


प्राप्त माहितनुसार, २०१८ मध्ये श्रीदेवी यांची मालमत्ता ३५ मिलियन डॉलर म्हणजे, २२७ कोटी रपये इतकी झाली होती. याशिवाय त्यांच्याके याशिवाय महागड्या लग्जरी गाड्याही होत्या. त्याच्या एकूण मालमत्तेची बेरीज करता जवळापस ती २४७ इतकी होते. आश्चर्यकारक असे की, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती ही सरासरी २४ टक्क्यांनी वाढत होती. २०११ मध्ये त्यांनी जेव्हा बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा, त्यांची वार्षिक कमाई १३ कोटी रूपयांवर पोहोचली होती.