मुंबई : असं म्हटलं जातं की, प्रेमासमोर कितीही पैसा ठेवला तरी तो फिका पडेल. मात्र काही संशोधकांनी प्रेमावर पैशाचा किती प्रभाव पडतो यावर संशोधन केलं आहे. त्यांच असं म्हणणं आहे की, प्रेमात देखील पैसा बोलतो. पैशासमोर नातं नेहमी कठोर असतं. पैसे आणि प्रेम हे दोन्ही शब्द अगदी लहान आहेत मात्र त्यांचा अर्थ खूप खोल आहे. काही जण आपल्या कुटुंबाला पैशासाठी सोडून जातात तर काही जण पैशाचा कुटुंबासाठी त्याग करतात. प्रेमापुढे जगाभरातील संपत्ती कमी पडते. पण काय करोडो रूपयांची प्रेम विकत घेता येतं का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसा आज प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जेव्हा लग्नासाठी मुली मुलगा शोधतात तेव्हा पहिल्यांदा त्याचा पगार पाहिला जातो. लग्नानंतर आपल्या मुलीला चांगल आयुष्य मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या जगात प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावतो. अशावेळी ते अनेकदा आपल्या कुटुंबियांपासून लांब राहतात. असं म्हटलं जातं की, पैसा माणसाची गरज आहे. मात्र जीवनात प्रेम देखील तितकच महत्वाचा आहे. माणूस दिवसरात्र काम करून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमावक असते. मात्र यातून तो आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकत नाही. 


2014 मध्ये केलेल्या संशोधनात असं समोर आलं आहे की, ज्या लोकांना पैसा अधिक वाटतो त्यांची पत्नी आणि मुलं यांच्या प्रती नकारात्मक भूमिका असते. या सर्व्हेत अशी गोष्ट समोर आळी की, मुलींनी लग्नाकरता फायनान्स क्षेत्र आणि आयटी क्षेत्रातील व्यक्ती जोडीदार म्हणून निवडला जातो. तिथेच मार्केटिंग क्षेत्रातील मुलांना कमी मागणी आहे. 70 टक्के मुली आपल्या जीवनसाथीचा पगार महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये असावा असा विचार करतात. 20 टक्के मुली आपल्या पार्टनरचा पगार 1 लाख रुपये असावा असा विचार करतात.