मुंबई : काही दिवसांपूर्वीच यंदाच्या गणेशोत्सवाची मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. पाहता पाहता ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवसही उजाडला. सणासुदीच्या या दिवसांमध्ये सध्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य पाहायला मिळत आहे. पण, अर्थातच यामध्ये कोरोनाचं सावटही पाहायला मिळत आहे. कितीची नाकारलं तरीही कोरोनाचीच किनार असल्यामुळं यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी अनेकांना आपल्या आप्तजनांच्या घरीही भेट देता येणं शक्य झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हीच परिस्थिती आणि माहेरवाशीणीच्या दृष्टीनं अतिशय समर्पक असं एक गीत सादर करणाऱ्या कोळीवाड्यातील महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'आम्ही कोळी' या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या काहींनी स्टेटस, टाईमलाईनवरही शेअर केला आहे. 


सदर पेजवर व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार मनोरी कोळीवाडा येथील महिलांनी हे अफलातून गीत सादर करत अतिशय पारंपरिक स्वरुपात गणरायापुढं फेर धरला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता, घरात राहण्याचाच सल्ला सर्व स्तरांतून देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर एका पारंपरिक गीताला नव्या अंदाजात सादर करण्यात आलं आहे. 


 गणपती बाप्‍पा मोरया  कोळी समाजाचा सर्वात आवडता सण म्हणजे गौरी गणपती. पिढ्यान पिढ्या चालत आलेली आपली परंपरा आजही...

Posted by आम्ही कोळी on Monday, August 24, 2020

'गौरी गणपतीचे सणाला गं बहिणी 
यंदा नको येव तू माहेराला !!
गाडी उभी आहे पोलिसांची मागले दाराला
वाट बघते तुमची कोरोना रस्त्याला ....!!!',
असे या गाण्याचे बोल आहेत. गौरी- गणपतीच्या या सणाला सर्वत्र अतीव महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच काही समाजांचं वेगळेपण हे त्यांच्या कलांमध्ये असतं. हा व्हिडिओ अशाच एका कलेचा नजराणा ठरत आहे.