कोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळी कोळीवाड्याचा विकास करणं राज्य सरकारला कदाचित महागात पडू शकतं. कारण कोळीवाडा ही झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती नाही तर ते गावठाण आहे, असा त्यात राहणा-या नागरिकांचा दावा आहे.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळी कोळीवाड्याचा विकास करणं राज्य सरकारला कदाचित महागात पडू शकतं. कारण कोळीवाडा ही झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती नाही तर ते गावठाण आहे, असा त्यात राहणा-या नागरिकांचा दावा आहे.
खाजगी विकासकाच्या माध्यमातून विकास
त्यामुळे विकासाच्या नियमांतर्गतच गावठाणाचा विकास केला जावा असं नागरिकांचं म्हणणं आहे. तरीही कोळीवाड्यातल्या चार एकर भूखंडाचा विकास एका खाजगी विकासकाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
विरोध दर्शवण्यासाठी मोर्चा
या विकास प्रकल्पाला कोळीवाड्यातील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवलाय. आपला विरोध व्यक्त करण्यासाठी रहिवासी मंगळवारी रात्री रस्त्यावर उतरले. त्यांनी शांततेत मेणबत्ती मोर्चा काढला.